Indu Atya – Reflections of her niece, Madhavi

The following article about Indirabai Bhajekar, Bhausaheb‘s eldest child and Shriram Jatar‘s granddaughter, has been written by Madhavi Jatar, the daughter of Sadashiv (Balu) Jatar, and the granddaughter of Bhausaheb.

इंदू आत्या : एक मुक्त चिंतन

– माधवी दाते (जटार)

इंदू आत्या, माझी सर्वात मोठी आत्या. रुढ अर्थाने ती माझी आत्या होती, पण तसं पाहिलं तर ती माझी आजी होती. तिच्यात आणि माझ्या बाबांच्या वयात २१ वर्षांचे अंतर होते. बाबा आणि सुधीर काका इंदू आत्या कडे राहात होते, तेव्हा तीने केवळ त्यांची ताई न राहाता, आई बनून त्यांच्यावर संस्कार केले. ती केवळ अशोक दादा, नीलू , बाबा, सुधीर काका यांचीच आई नव्हती, तर तिच्या बालवाडीतील असंख्य मुलांची व निवाऱ्यातील व्रृध्दांची ती माऊलीच होती. काय योगायोग आहे बघा, ह्या आदर्श मातेच्या हस्ते १९७७च्या डिसेंबर महिन्यात ग.दि.मांच्या आईचा “माईसाहेब पारखी आदर्श माता” हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

framed siblings
JUNE 1939. Indutai with her husband, son and siblings. From L to R: Balu Jatar, Ashok Bhajekar, Bhalchandrao, Indira Bhajekar, Usha Thakar née Jatar, Sheila Bhagvat née Jatar and Sudhir Jatar.

नक्की कोण होती ही इंदिरा ? घरातील मोठ्यांची लाडकी इंदी. अज्ञाधारक. एकदा बापुरावांनी इंदू आत्याला सामानाची यादी करण्यास सांगितले. यादी पादत्राणांची होती. त्यामुळे इंदू आत्याने वरती “श्री” लिहिले नाही. त्यामुळे तीने बापुरावांचा मुकाट्याने ओरडा खाल्ला होता. हि आठवण इंदू आत्यानेच रेडिओवरून प्रसारीत झालेल्या कार्यक्रमात सांगितली होती.

ती भालचंद्ररावांची सखी-सचिव-सहचारिणी होती. लग्नानंतर ती “सुधारक” भाजेकर कुटुंबात दुधात साखर विरघळावी तशी विरघळली. अर्थात स्वत:चे वेगळं अस्तीत्व राखून. जात्याच हुशार असल्याने तिचे बहुआयामी व्यक्तीमत्व विकसीत होत गेले.

भालचंद्रराव म्हणजे साक्षात देव माणूस. अतिशय सज्जन. अधुनिक काळातील संत तुकारामच. त्यांनीं देखील इंदू आत्याला सर्वार्थाने स्वात्यंत्र आणि साथ दिली. इंदू आत्याने देखील त्यांना पूर्णपणे सहकार्य केले. (राहुल म्हणाला, त्या प्रमाणे अशिलांना जेवण, चहा देणे इत्यादी). जेव्हा टिव्हीवर “उंच माझा झोका” ही मालिका प्रसारीत होत होती. तेव्हा “रमा-माधव” ही जोडी बघताना नेहमी “इंदू आत्या-भालचंद्र रावांच्या” जोडीची आठवण येईची.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंदू आत्या गरीब मुलांना दूध वाटपाचे काम करत होती. “पुणे महिला मंडळाची” ती एक आघाडीची कार्यकर्ती होती. त्यामुळे १९७३ साली दिल्लीला झालेल्या “All India Women’s conference” मध्ये तिची निवड झाली होती.

ही झाली तिची सामाजिक बाजू. तिने कौटुंबिक जबाबदाऱ्या अतिशय उत्तमपणे पार पाडल्या. दर वर्षी ती गौरीची सवाष्ण म्हणून स्वत:च्या भावजयीला, म्हणजेच माझ्या आईला जेवायला बोलवायची. एकदा एका अधिक महिन्यात तिने नीलू आणि अरविंदरावांच्या बरोबरीने नीलूच्या मैत्रिणी आणि त्यांच्या नवऱ्यानां वाण दिले होते.

इंदूआत्या रोज सकाळी नरसोबाच्या देवळात किर्तनाला येईची. (घरी जाण्या आधी अधून मधून नीलसदन मध्ये डोकंवायची. घरातील प्रत्येकाशी बोलायची. ती एक जगत् मैत्रिण होती. तिचे सर्व वयातील व स्तरातील मैत्र होते.)

ती एकादश्या करायची. तिने आळंदी ते पंढरपूर अशा चालत वाऱ्या केल्या होत्या. १९८५ साली ती आषाढ महिन्यात पंढरपूरला राहिली होती. मला वाटते की २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील सुशिक्षित स्त्रियानां विठ्ठलाचे आकर्षण होते (इरावती कर्वे विठ्ठलाला मित्र /boyfriend म्हणायच्या.)

इंदू आत्याला सर्व क्षेत्रांची आवड होती. १९८५च्या डिसेंबर महिन्यात आम्ही (ती,माझी मैत्रीण सुनेत्रा आणि मी) “जाणता राजा” हे नाटक रमणबागेच्या पटांगणात बघितले होते.

इंदूआत्या खूपच धीट होती. ती गुरूवार पेठेतल्या प्रचंड वाड्यात एकटी राहत होती. ती म्हणायची “घाबरायचे कारण काय, मी भाऊसाहेबांची मुलगी आहे.” इंदूआत्या खूपच स्वाभिमानी होती.

किती आणि काय लिहू? तिचे समाजकार्य पुढे चालू ठेवणे हिच तिला खरी श्रध्दांजली. नीलूने आणि मनीषाने तिचे निवाऱ्यातील काम पुढे चालू ठेवले आहे.

वज्राहून कठीण आणि लोण्याहून मऊ आश्या इंदूआत्यला शतशः प्रणाम!🙏

indira B
Indu Atya

2 thoughts on “Indu Atya – Reflections of her niece, Madhavi

  1. Madhavi’s write-up about Indutai my eldest sister reminded me about Indutai never forgetting to send me a Rakhi wherever I was. Generally my other sisters were not so particular. In Pune too, I religiously went to her residence to tie the Rakhi. Another thing, I attended the function when she received a Lifetime Achievement Award from the All India Women’s Conference in January 2003, presented by Najma Heptullah (granddaughter of Maulana Azad) at Fergusson College, Pune. She was 93 then and I remember how sprightly she walked. I thought I would add these two events to what Madhavi has written

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s