Vidula Bhagwat née Jatar is the eldest child of Sharad and Nirmala Jatar. Sharad (Vinayak) Jatar was the son of Appasaheb (Vasudev). Appasaheb was the son of Bapurao and the grandson of Shriram Jatar.
मी विदुला रविंद्र भागवत (शरद जटार आणि निर्मला जटार यांची मोठी मुलगी।) ललिता आणि श्रीनिवास माझी धाकटी भावंडं।
माझा जन्म पुण्याचा पण बालपण सायनला गेले।शालेय शिक्षण दादर च्या किंग जॉर्जे मुलींची शाळा।माझी आई ग्वाल्हेर ची असल्याने गाण्याच्या वातावरणात वाढलेली।त्यामुळे मलाही वल्लभ संगीतालय येथे गाणे शिकण्यासाठी पाठवले अभ्यासाची तशीच गायन शाळा रोज असायची।
11वी नंतर मी SNDT कॉलेज मध्ये प्रवेश घेतला ।आमच्या प्रिन्सिपॉल होत्या माननीय सिंधुताई खेर।माझ्या बाबांना त्यांच्या कार्याबद्दल खूप आदर होता त्यामुळे तिथे प्रवेश घ्यायचा हे ठरलेलेच होते।B sc होम science ची पदवी घेतल्यानंतर माझा विवाह डॉक्टर रविंद्र गोविंद भागवत (MD Path।DPB Gold medalist) यांच्याशी संपन्न झाला।त्यावेळी ते KEM।आणि sion हॉस्पिटल येथे assistant प्रोफेसर म्हणून कार्यरत होते।
त्यानंतर काही दिवसातच त्यांनी ठाण्याला स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली।आम्ही खारहून ठाण्याला राहायला आलो।माझ्या दोन्ही मुलींची पूर्णवेळ शाळा झाल्यानंतर आता तू काहीतरी शिक असं सांगितलं तुला तुझी स्वतंत्र ओळख हवी।त्यामुळे मुलींना पण respect असतो आईबद्दल।
माझ्यापुढे 2-3 पर्याय होते।पण मी गाणं हा आवडता पर्याय निवडला।मी संगीत विषय घेऊन MA आणि MPhil Dr प्रभा अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले।हे सगळं यांच्या प्रचंड प्रोत्साहनामुळेच शक्य झालं।
आधीचा पाया मजबूत होता त्यामुळे 30 व्या वर्षी पुन्हा गाणं सुरू करूनही मी प्राविण्य मिळवू शकले।स्वतंत्र कार्यक्रम, AIR आर्टिस्ट म्हणूनही कार्यक्रम सादर केले। 1990 साली मी श्री संगीत विद्यालयाची स्थापना केली व अनेक विद्यार्थिनींना संगीताचे रीतसर प्रशिक्षण दिले।व हे कार्य अजूनही अविरतपणे सुरू आहे।
माझे पती डॉ रविंद्र यांचे 2017 मध्ये वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाले।

Nice. I too studied in King George 10th & 11th SSC 1969.
LikeLiked by 1 person